संगमनेर तालुक्यात युतीच्या कार्यकर्त्यांना मारहाण ; गुन्हे दाखल
घारगावसह घुलेवाडी येथील घटना ; नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ पाटील यांची जखमींना भेट
संगमनेर तालुक्यात युतीच्या कार्यकर्त्यांना मारहाण ; गुन्हे दाखल
घारगावसह घुलेवाडी येथील घटना ; नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ पाटील यांची जखमींना भेट
संगमनेर दी 2 प्रतिनिधी
जनावरे शेतात का चारतो असे विचारले असता दमदाटी केल्याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असल्यामुळे तक्रार दिल्याचा राग आल्याने नऊ ते दहा जणांनी मारहाण केल्याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अजित अण्णासाहेब काळे ( वय 30 वर्ष, रा. तळेवाडी पोखरी बाळेश्वर ता संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सौरभ फटांगरे यांनी त्याची जनावरे कांद्याच्या शेतात सोडली. तेव्हा चुलते लहानू काळे यांनी सौरभ यास त्याच्या मोबाईलवर फोन करून आमच्या कांद्याच्या शेतात तुझी जनावरे का सोडली असेल विचारले असता, ती जनावरे नाहीत असली तर बघून घेईन, जास्त वळवळ करायची नाही, नाहीतर तुमच्याकडे बघतो असा दम दिला. त्यानंतर सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान सौरभ फटांगरे हा अजित काळे यांच्या विहिरीजवळ विजेच्या खांबावरती आकडा टाकत असताना त्याला सांगितले की, आमच्या येथे विजेच्या आकडा टाकू नको. त्यावेळी तो म्हणाला तुम्ही माझ्या नादाला लागू नका नाहीतर मी एखाद्याचा मर्डर करून टाकील. दरम्यान आम्ही रस्त्याने जात असताना अचानक गणेश बाळू फटांगरे, सौरभ बाजीराव फटांगरे, निखिल बाजीराव फटांगरे, श्रीरंग सूर्यभान फटांगरे, बाळू सूर्यभान फटांगरे, मिराबाई बाळू फटांगरे, वैशाली बाजीराव फटांगरे, सोनल सौरभ फटांगरे, सरिता श्रीरंग फटांगरे असे (सर्व रा. तळेवाडी, ता संगमनेर) यांनी आमची गाडी अडवली तेव्हा गणेश फटांगरे यांनी हातात कुराड घेऊन तसेच दुसऱ्याने लोखंडी रॉड व हातात दगड घेऊन तर काही जणांनी लाकडी दांडके घेऊन काळे यांच्या डोक्यात मारला. त्यामुळे ते खाली पडले असता गणेश फटांगरे यांनी माने जवळ तर काहींनी दगडाने माझ्या डाव्या डोळ्याजवळ मारहाण केली. यावेळी डाव्या डोळ्याला मार लागला आहे. त्यानंतर ही घटना वडिलांना समजतात ते त्या ठिकाणी आले नंतर त्यांनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत.
दरम्यान संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे फ्लेक्स लावल्याच्या कारणावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण झालेल्या तरुणांना कुटे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्याना नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ पाटील यांनी कुटे हॉस्पिटल मध्ये जाऊन भेट घेत त्यांना धीर दिला.
समोरच्यांना पराभव पचवता येत नाही. त्यांना काय हल्ले करायचे ते करू द्या आमच्या कार्यकर्त्यासोबत माझ्यासह राज्याचे युतीचे सरकार आहे. शहर पोलीस निरीक्षक यांना तत्काळ सूचना केल्या असून आरोपींना त्वरित अटक करून कठोरात कठोर कारवाई करावी. येणाऱ्या काळात पुन्हा अशा घटना घडल्या तर कार्यकर्त्यांनी लगेच माझ्याशी संपर्क करावा. कायदा कोणीही हातात घेऊ नये. असे कृत्य करणार्यावर कारवाई नक्कीच होणार.
—– नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ पाटील.